rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अंजली दमानिया यांची मुख्यमंत्री फडणवीस यांना कायदेशीर नोटीस

anjali damaniya
, शनिवार, 16 ऑगस्ट 2025 (17:33 IST)
धनंजय मुंडे सातपुडा बंगला प्रकरणात अडचणीत आले आहे. पाच महिन्यांपूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर देखील अद्याप सरकारी बंगला रिकामा केलेला नाही. यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.  
धनंजय मुंडे यांच्यावर सातपुडा बंगल्याचे 42 लाख रुपये थकीत असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. बंगल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर धनंजय मुंडे म्हणाले होते की, मलबार हिल परिसरात भाड्याने घर मिळणे कठीण आहे, माझा शोधही सुरू आहे. परंतु अंजली दमानिया यांनी दोन दिवसांपूर्वी ट्विट करून धनंजय यांचे वरील खोटे उघड केले होते.
अंजली दमानिया म्हणाल्या होत्या की मला वाटते की त्यांना भाड्याने घर कसे शोधायचे हे माहित नाही. म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे की सध्या मलबार हिल परिसरात 72 घरे भाड्याने उपलब्ध आहेत. खाली दिलेल्या ठिकाणी चौकशी करा. ज्या इमारतीत तुमचा स्वतःचा फ्लॅट आहे, तिथे फ्लॅट देखील भाड्याने उपलब्ध आहे. अनावश्यक कारणे देऊ नका.
ALSO READ: शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक, महापालिका निवडणुकीपूर्वी ठाण्यात मोठी कारवाई, ७९९ कोटी रुपयांचा दंड माफ
 अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांना सरकारी बंगला रिकामा करण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम दिला असून बंगला रिकामा न केल्यास कायदेशीर नोटीस पाठवण्याचे म्हटले.  मुदत संपताच दमानिया यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना कायदेशीर नोटीस पाठवली.
 
Edited By - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माजी क्रिकेटपटू निकोलस साल्दान्हा यांचे निधन