शेतकऱ्यांच्या शेतीमालाला खर्चावर आधारित हमी भाव मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज किंवा इतर खाजगी कर्ज शेतकरी फेडू शकत नसल्यामुळे नैराश्य येऊन तो आत्महत्या करतो आहे.
अनेक वर्षे सातत्याने हे सुरू आहे. पण सहन करण्यालाही काही सीमा असतात. जेव्हा सहन करण्याची क्षमता संपते तेव्हा शेतकरी नाइलाजास्तव रस्त्यावर उतरतो आणि सरकारला विनंती करुन सांगतो की मी माझ्या परिवारासाठी तसेच माझ्याजवळ असणाऱ्या माझ्या गाई, बैल आणि इतर पशुधन वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहे. अशा वेळी सरकारने सहानभुतीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.