Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिर्डीत जाणाऱ्या साई भक्तांसाठी आणखी एक आनंदवार्ता! पुन्हा सुरू केली ही प्रथा

शिर्डीत जाणाऱ्या साई भक्तांसाठी आणखी एक आनंदवार्ता! पुन्हा सुरू केली ही प्रथा
, मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 (14:34 IST)
शिर्डी  – लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी नगरीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोविड काळात गेले दोन वर्षे गुरुस्थान मंदिराला आरतीवेळी प्रदक्षिणा घालण्यास परवानगी नव्हती. कोविड १९च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. आता तब्बल अडीच ते तीन वर्षांनी साईभक्तांना गुरुस्थानाला प्रदक्षिणा घालता येणार आहे. शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी भाग्यश्री बानायत यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक काढून ही माहिती दिली आहे.
 
आरतीच्या वेळी गुरुस्थान मंदिराच्या निमवृक्ष भोवताली प्रदक्षिणा घालण्याची खरंतर परंपरा आहे. साई समाधी मंदिराजवळच गुरुस्थान मंदिर असल्याने भाविकांची दर्शन घेण्यासाठी नेहमीच गर्दी पाहायला मिळत असते. याच निमवृक्षाखळी साईबाबा ध्यान धारणा करत असल्याचं सांगितलं जातं. हे माझ्या गुरूंचे स्थान असल्याचे साईबाबांनी सांगितल्याच्या साईसतचरित्रात उल्लेख केला आहे. त्यामुळे गुरूस्थान मंदिरास प्रदक्षिणा घालण्यासाठीचे निर्बंध हटवल्याने भाविक आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
 
शिर्डीमध्ये देश – विदेशातून साई भक्त साई बाबांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. साई बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर साई बाबांचे गुरुस्थान म्हणून ओळख असलेल्या गुरूस्थान मंदिराच्या निमवृक्ष भोवताली प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे. गुरूस्थान मंदिराला आरतीवेळी प्रदक्षिणा घालण्यास परवानगी नव्हती. कोविड १९च्या प्रादुर्भावापासून खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे शिर्डीत गेलेले अनेक भाविकांचा गुरुस्थान दर्शन आणि निमवृक्षाला प्रदक्षिणा घालता येत नसल्याने अनेकांचा हिरमोड होत होता. संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे गुरूस्थानी प्रदक्षिणा घालता येणार असल्याचे जाहीर केले असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणे बुधवार पेठेत दोन गटात तुफान हाणामारी