महाराष्ट्र सरकारच्या समस्या दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढत आहेत.सचिन वाझे यांच्या निलंबनानंतर महाराष्ट्रातील राजकीय वादळात एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरोप करत आहे. ज्या प्रकारे मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना त्यांच्या पदावरून काढून डीजी होमगार्ड बनविण्यात आले, त्यानंतर त्यांनी उघडपणे सरकार आणि विशेषत: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात आपला मोर्चा उघडला आहे.
परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर 100 कोटी रुपयांची वसूली करण्याचे आरोप लावल्यावर विरोधकांच्या निशाण्यांवर आलेली महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर आणखी एका आयपीएस अधिकाऱ्याने आरोप केला आहे. महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे डीजी संजय पांडे यांनी ही महाराष्ट्र पोलीस विभागाच्या डीजी स्तरावरील राज्य सरकारच्या केलेल्या बदल मध्ये संजय पांडे याना डीजी न केल्या बद्दल उच्च न्यायालयात सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्याचा विचार करत आहे.
संजय पांडे म्हणाले की सरकार ज्या पद्धतीने काम करीत आहे.ते पोलीस खात्याचे मॉरल कोठेतरी कमी करत आहे. अशा परिस्थितीत सक्षम अधिकारी असून देखील एखाद्या दुसऱ्या अधिकाऱ्याला त्याच्या जागी बसवणे कुठे तरी सरकारवर प्रश्न उभे करणारे आहे.