Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारला घेराव घातला,

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारला घेराव घातला,
, बुधवार, 17 मार्च 2021 (22:24 IST)
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेन्द्र फडवणीस यांनी अँटिलीया प्रकरणात अटक केलेल्या सचिन वाझे यांच्या बद्दल शिवसेने आणि उद्धव ठाकरे सरकारचा घेराव केला आहे. 
फडणवीस यांनी खुलासा केला आहे की जो पर्यंत ते शिवसेने सह सरकार चालवीत होते तेव्हा उद्धव ठाकरे यांनी वाझे यांना पुन्हा कामावर घेण्याचा दबाब टाकला होता. या साठी स्वतः उद्धव ठाकरे यांनी फोन वर संभाषण केले होते आणि शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी भेटून शिफारस ही केली होती. 
माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की त्यांनी कायदेशीर सल्ला आणि वझे यांच्या कामाच्या रेकार्ड ला बघून पुन्हा कामावर घेतले नाही.
 
 एसपीआय सचिन वझे यांना 2004 मध्ये निलंबित करण्यात आले होते 2008 मध्ये त्यांनी व्हीआरएस घेतले होते, जे स्वीकारले नाही. त्या नंतर ते शिवसेनेत सामील झाले आणि प्रवक्त्यांनी भूमिका देखील निभावली. 
देवेंद्र फडवणीस असे ही म्हणाले की, मुंबई पोलीस आयुक्तपदावरून काढून टाकण्यात आलेले परमबीर सिंग आणि सचिन वाझे हे लहान माणसे आहेत, यांच्या वर कोणाचे आशीर्वाद आहे, यांची चौकशी झाली पाहिजे.  
 
 मनसुख हिरेनच्या मृत्यूची चौकशी करणारी एटीएस योग्य प्रकारे चौकशी करत नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला. 
 देवेन्द्र फडणवीस म्हणाले की ,''मला हे समजत नाही की एटीएस कोणत्या दबावा खाली आहे. या प्रकरणेत सचिन वाझे एकटे नसून इतर कोण-कोण सामील आहे यांची रीतसर चौकशी झाली पाहिजे. हे पोलिसांचे अपयश नसून ,सरकारचे अपयश आहे. सरकार ने अशा महत्वाच्या ठिकाणी अशा व्याक्तीला बसविले आहे ज्याचा भूतकाळ वाईट आहे. त्याचा बचाव मुख्यमंत्री आणि सरकारने केला आहे. जर मी एवढे पुरावे दिले नसते तर कदाचित त्यांना महात्मा म्हटले गेले असते. 
 
फडवणीस यांनी म्हटले की साथीच्या आजारात पोलिसांची कमतरता म्हणून वाझे आणि त्यांच्या काही सह्कारीना सरकारने परत आणले. वाझे यांचे वसुली प्रकरणात देखील नाव आले होते. एवढे असून देखील त्यांना परत आणण्यात आले. एवढेच नव्हे तर वाझे यांना मुंबई क्राइम ब्रँचचे सर्वात महत्त्वाचे युनिट म्हणजे क्राइम इंटेलिजेंस युनिट.चे प्रमुख देखील केले गेले. देवेन्द्र फडणवीस म्हणाले की सचिन वाझे यांचे शिवसेनेच्या अनेक नेत्यांशी जवळचे आणि व्यावसायिक संबंध आहे. फडणवीस म्हणाले की, जिलेटिन स्कॉर्पिओ कार वाझे यांच्या कडे होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई पोलीस आयुक्तपदावर हेमंत नगराळे यांची नियुक्ती झाली.