प्रत्येकाला वाटते स्वताचे घर असावे. म्हाडाचे स्वस्त घर घेणाऱ्यांसाठी घर घेण्याची सुवर्ण संधी आहे. आता मुंबई व पुण्यात म्हाडा कडून घर घेणं सोपं झालं आहे. म्हाडाचे4 हजार 777 घरांसाठी अर्ज सुरु झाले आहे.
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून विविध उत्पन्न गटामधील पुणे, सोलापूर, कोल्हापूर सातारा, सांगली या पाच जिल्ह्यात लॉटरी जाहीर केली आहे. यात पुण्यातील पिंपरी, चिंचवड येथील 745 आणि 561 घरांचा समावेश करण्यात आला आहे.
लॉटरीचा प्रारंभ पुणे मंडळाचे सभापती शिवाजी आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला असून आता अर्जदार ऑनलाईन अर्ज करू शकतील.
अर्ज कसा आणि कुठे करावा -
अर्जदारांनी www.mhada.gov.in या संकेतस्थळा भेट द्यावी किंवा https://mhada.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. महत्त्वाचं म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर आपली नोंदणी करावी, असे आवाहन म्हाडा पुणेचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.
अर्जदारांनी ऑनलाईन अर्जाची नोंदणी 8 एप्रिल सायंकाळी पाच वाजेपर्यंत करावी. तर लॉटरी साठी अर्ज ऑनलाइन अर्ज 10 एप्रिल रोजी रात्री 11.59 पर्यंत सुरू असणार आहे. अर्जाचा ऑनलाइन शुल्क भरणा 12 एप्रिलपर्यंत करता येऊ शकते.