Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पटोले यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, दिलीप वळसे-पाटील यांचे आश्वासन

पटोले यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, दिलीप वळसे-पाटील यांचे आश्वासन
, सोमवार, 28 मार्च 2022 (21:50 IST)
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वारंवार आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत. त्यांच्यावर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार मंगल प्रभात लोढा यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्राद्वारे केली होती. नाना पटोले यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले.
 
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अशोभनीय वक्तव्य केले आहे. नाना पटोले यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच महाराष्ट्र पोलिसांनी नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेण्यास सूचना द्यावी, अशी मागणी मुंबई भाजपा शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
 
नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नाना पटोले वारंवार आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत, तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नसून त्याच्यावर कारवाई करावी यासाठी मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली संतप्त भाजपा कार्यकर्त्यांनी मंत्रालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषण केले होते. साखळी उपोषण सुरू असताना पोलिसांनी मंगल प्रभात लोढा तसेच भाजपा कार्यकर्त्यांना अटक देखील केली होती. त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन नाना पटोले यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी आपण निवेदनाद्वारे केली असल्याचे मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एसटी संपाचा आणखीन एक बळी, बस चालकांची आत्महत्या