Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी श्रीनिवास रेड्डी यांच्या अटकेचे आदेश

दिपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी श्रीनिवास रेड्डी यांच्या अटकेचे आदेश
, रविवार, 4 एप्रिल 2021 (11:49 IST)
दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणातील निलंबित अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांचा अटकपूर्व जामीनअर्ज आज कोर्टाने फेटाळून लावला. तसेच रेड्डी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. 
गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने रेड्डी यांच्या वकिलाने अचलपूर येथील तदर्थ जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक एक मध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर आज शनिवारी दोन्ही पक्षकारांच्या बाजू ऐकून घेतली. मात्र न्यायमूर्ती एस. ए. मुंगीलवार यांनी श्रीनिवास रेड्डी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. रेड्डी यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्यास रेड्डी फरार होण्याची शक्यता दर्शवण्यात आली. या युक्तिवादानंतर रेड्डी यांचा अर्ज फेटाळून लावण्यात आला.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या हरिसाल वनपरिक्षेत्राच्या अधिकारी आरएफओ दीपाली चव्हाण यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी दीपाली चव्हाण यांनी सुसाई़ड नोट लिहिली होती. ती नोट त्यांनी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक रेड्डी यांना उद्देशून लिहिली होती. त्यातून उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हेच दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'कोव्हिडचा कहर आहे आणि महाराष्ट्र त्यात एक पाऊल पुढे आहे हे दुर्देव'- संजय राऊत