Publish Date: Sat, 15 Apr 2023 (08:54 IST)
Updated Date: Sat, 15 Apr 2023 (08:58 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंड करण्यापूर्वी मातोश्रीवर येऊन रडले होते, भाजपसोबत गेलो नाहीतर मला जेलमध्ये टाकतील असं म्हटलं होतं, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी हैदराबाद येथील एका कार्यक्रमात केला होता.
आदित्य ठाकरे यांच्या या विधानावर टीका करताना भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटलं होतं की, आदित्य ठाकरे यांचा पप्पू होऊ नये यासाठी त्यांनी आपल्या वक्तव्यांना आवर घालणे गरजेचं आहे.
विखे-पाटलांच्या या विधानावर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी संताप व्यक्त करताना म्हटलं की, राधाकृष्ण विखे पाटील रंग बदलणारा सरडा असल्याचे म्हटलं आहे.
टीव्ही 9 मराठीशी बोलताना अरविंद सावंत यांनी म्हटलं की, त्यांची दखल का घेता? या पक्षातून त्या पक्षात. ते आमच्याकडे होते ना? त्यांना विचारा कोणता पक्ष शिल्लक उरला का?
Published By -Smita Joshi