Publish Date: Thu, 27 Oct 2022 (21:13 IST)
Updated Date: Thu, 27 Oct 2022 (21:15 IST)
महाराष्ट्रात परतीच्या पावसाने निरोप घेतला आहे. त्यामुळे सध्या राज्यात आकाश निरभ्र झाले आहे. याचा परिणाम म्हणून तापमानात घट झाली असून, थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढला आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातामध्ये थंडीचा जोर चांगला आहे. पुणे, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये थंडीमुळे हुडहुडी वाढली आहे.
सध्या उत्तरेकडून थंड आणि कोरडे वारे वाहत आहे. या हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले आहे. तर दिवसा असलेल्या स्वच्छ सूर्य प्रकाशामुळे उन्हाचा चटका वाढून कमाल तापमानात वाढ झाली आहे.
राज्यामधील बहुतांशी ठिकाणी किमान तापमान 20 अंशांच्या खाली आले आहे. बऱ्याच ठिकाणी किमान तापमानाचा पारा 15 ते 20 अंशाच्या आसपास आहे. तर कमाल तापमान 30 ते 35 अंशांच्या आसपास आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor