ज्यांनी कुणी हा व्हिडिओ व्हायरल केला असेल त्यांच्यावर तात्काळ कारवाई होणं गरजेचं आहे. महिला म्हणून आम्ही शीतल म्हात्रे यांच्या पाठीशी आहोत, पणं जे पेरल तेच उगवलं आहे. त्याचा त्रास तुम्हाला होताना दिसत आहे. अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी म्हांत्रेच्या कथित व्हायरल व्हिडिओ वर केलीय. तर आम्ही विरोधात असलो तरी त्यांच्या पाठीशी आहोत. असे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणं निंदनीय आहे असही त्या म्हणाल्या आहेत
सगळ्या विरोधातील महिला शितल म्हात्रे यांच्या सोबत
भाजप आणि शिंदे गटातील काही जणांनी ही अशा अनेक महिलांचे व्हिडिओ करून टाकतात त्यांच्यावर कारवाई केली नाही. त्यामुळे ही हिम्मत वाढली आहे. व्हिडिओ खरा आहे की खोटा हे तपास केल्याशिवाय कळणार नाही. सार्वजनिक ठिकाणी राजकारणी महिला अशी कृत्य करतील असे वाटत नाही. ही खात्री आहे. पण खूप वाईट वाटलं. म्हात्रे आता विरोधकांवर आरोप करत असेल तरी तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलाय. त्या लोकांनी तुमचा व्हिडिओ व्हायरल केलं नाही ना त्याचा तपास झाला पाहिजे. सगळ्या विरोधातील महिला शितल म्हात्रे यांच्या सोबत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
आता तुम्ही यंत्रणा कामाला लावा
आता गृहमंत्र्यांनी ताबडतोब चौकशी करुन कारवाई करावी. तसेच सोशल मीडियावर जेजे अंधभक्त व्हिडिओ करून टाकतात त्यांच्यावर ही त्वरित कारवाई करावी ही मागणी आहे. ठाकरे गटातील कोणताही व्यक्ती अस करु शकत नाही. भाजप आणि शिंदे गट सातत्याने बदनामी करत आहे. आमचीही बदनामी करण्याचं काम भाजप आणि शिंदे गटाच आहे. ठाकरे गटातील कुठलीही व्यक्ती अस करणार नाही, याची चौकशी करा. टीका करायची म्हणून बोलू नका. तुमच्यावर वेळ आली म्हणून तुम्हाला दुःख कळत, पणं अशी वेळ अनेक महिलांवर आली यावर गप्प बसतात, आता तुम्ही यंत्रणा कामाला लावा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor