अशोक चव्हाणांनी रुग्णालयातूनच फेसबूकवर विडीओ केला शेयर

गुरूवार, 28 मे 2020 (22:06 IST)
काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोना व्हायरसची लागण झाली. मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात अशोक चव्हाणांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातूनच अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या स्पिकअप इंडिया या अभियानात सहभाग नोंदवला. यासाठी अशोक चव्हाणांनी रुग्णालयातूनच एक व्हिडिओ फेसबूकवर शेयर केला आहे.
 
केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या मागण्या तातडीने मंजूर कराव्यात. केंद्राकडून भरीव मदत मिळत नसल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. गरीब कुटुंबांच्या बॅंक खात्यात एकरकमी १० हजार रूपये जमा करावेत. तसेच कॉंग्रेस पक्षाने सुचवलेल्या 'न्याय' योजनेनुसार पुढील सहा महिने त्यांच्या खात्यात दरमहा ७ हजार ५०० रूपये जमा करावेत, अशी मागणी अशोक चव्हाणांनी केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख TikTok ला टक्कर देणार भारतीय Mitron अ‍ॅप, 50 लाखांहून अधिक डाऊनलोड