Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Latur : दहशतवादविरोधी पथकाची कारवाई,STD सेंटरवर छापा

Latur : दहशतवादविरोधी पथकाची कारवाई,STD सेंटरवर छापा
, शनिवार, 17 जून 2017 (11:48 IST)
लातूरमध्ये एका अवैध STD सेंटरचं जाळं उद्ध्वस्त करुन, दोघांना अटक करण्यात आली आहे.या कॉलसेंटरवरुन सीमेपल्याड शत्रू राष्ट्रात माहितीची देवाण-घेवाण होत असल्याच्या संशयावरुन ही छापेमारी करुन, दोघांना अटक केली आहे.


महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. जम्मू काश्मीरमधून लष्करी गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनंतर एटीएसने लातूर पोलिसांच्या मदतीने ही छापेमारी केली.आंतरराष्ट्रीय कॉल अवैध गेटवेच्या माध्यमातून, लोकल लाईनवर वळवून, माहितीची देवाण-घेवाण लातूरमधून चालत होती. अशापद्धतीचं तंत्र गुप्तचर यंत्रणेकडून शेजारी देशांशी संपर्क, माहिती काढण्यासाठी केला जातो. मात्र हे लातूरमध्ये सुरु असल्याने लष्करही अवाक् झालं होतं. त्यावरुन ही छापेमारी करुन, दोघांना अटक कऱण्यात आलं आहे.लष्कराने दिलेल्या माहितीवरुन एटीएसने लातूरमधील प्रकाशनगरातील एका 33 वर्षीय व्यक्तीच्या घरात छापेमारी केली. त्यावेळी त्यांना 96 सिमकार्ड्स, 1 कॉम्प्युटर, 3 अवैध कॉल ट्रान्सफर मशिन्स सापडले. एटीएसने केलेल्या या छापेमारीत सुमारे 1 कोटी 90 लाखांची साहित्य जप्त केलं आहे. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हॉकी संघासमोर आज कॅनडाचे आव्हान