Publish Date: Mon, 07 Feb 2022 (14:49 IST)
Updated Date: Mon, 07 Feb 2022 (14:51 IST)
बुलढाण्यात पोलीस स्थानकावरच हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. जमावाने मध्यरात्री शेगाव पोलीस ठाण्यात घुसून तोडफोड केली असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शेगाव पोलिसांना मध्यरात्री एकच्या सुमारास एका वाढदिवसाच्या पार्टीत डीजे सुरु असल्याची तक्रार आली होती. यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि डीजे बंद करायला लावला. नंतर काही वेळातच पोलीस ठाण्यावर 30 जणांचा जमाव धावून गेला आणि त्यांनी ठाण्यात घुसून तोडफोड केली.
जमावाकडून पोलीस ठाण्यातील फर्निचर, काचांची तसेच इतर सामानाची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.