वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये अनुसुची-१मध्ये समाविष्ट आणि राज्यप्राण्याचा दर्जा असलेल्या दुर्मीळ शेकरुची विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार नाशिक शहरातील कॉलेजरोड-महात्मानगर परिसरातील एका पेट स्टोरमध्ये उघडकीस आला आहे.नाशिक पश्चिम वनविभागाच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन छापा टाकून संशयित दुकानमालकाला ताब्यात घेतले. तसेच विक्रीसाठी ठेवलेले शेकरू सुरक्षित रेस्क्यु केले. मिळालेल्या गुप्त माहितीवरुन सहायक वनसंरक्षक गणेश झोळे, वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांच्या पथकाने मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले यांच्यासमक्ष शिताफीने दुकानावर छापा टाकला. यावेळी दुकानमालक संशयित आरोपी सौरव रमेश गोलाईत (२३,रा.दसक, जेलरोड) यास वनविभागाच्या कारवाई पथकाने ताब्यात घेतले आहे.