Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धक्कादायक : धुळे येथे रुग्णवाहिकाचा वापर करून गोवंशाची तस्करी करण्याचा प्रयत्न

ambulance
धुळे जिल्ह्यात आज एक धक्कादायक घटना समोर आली. रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स) चा वापर करून गोवंशाची तस्करी करण्याचा प्रयत्न गौरक्षक आणि पोलिसांनी हाणून पाडला.
 
मानवी जीव वाचवण्यासाठी असलेल्या रुग्णवाहिकेचा चक्क गोवंश तस्करांनी गैरवापर केल्याची एक धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळीच समोर आला.
मिळालेल्या माहितीनुसार संशयित रुग्णवाहिकेत १० गायी ठासून भरलेल्या होत्या.  बकरीदच्या पार्श्वभूमीवर गायी कत्तलीसाठी नेल्या जात असल्याचा संशय होता. गौरक्षकांना माहिती मिळाल्यावर त्यांनी वाहन अडवले. सोनगीर पोलिसांसोबत संयुक्त कारवाई करून गायींची सुटका करण्यात आली. तसेच दोन तस्करांना ताब्यात घेण्यात आले आहे.
तस्करांकडून पोलिसांना चकवा देण्यासाठी सतत नवनवीन युक्त्या शोधल्या जातात (जसे की दुधाचे टँकर, भाजीपाल्याचे ट्रक). मात्र, रुग्णवाहिकेचा असा गैरवापर केल्याने स्थानिक पातळीवर आणि सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कल्याणमध्ये २५ वर्षीय विवाहित मुलीची हत्या, वडील फरार