Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Aurangabad Bus caught fire : प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या धावत्या बस मध्ये आग लागली

Aurangabad Bus caught fire : प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या धावत्या बस मध्ये आग लागली
, रविवार, 18 सप्टेंबर 2022 (15:42 IST)
औरंगाबादच्या जालना येथे चित्तथरारक प्रकार बघायला मिळाले आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या स्मार्ट सिटी प्रवाशी बसला आग लागली. आगीच्या घटनेमुळे वाहतूक कोंडी झाली असून काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली.नागरिकांनी प्रसंगावधान राखून 7 प्रवाशांना जळत्या बसमधून बाहेर काढले. या आगीत बस जळून खाक झाली. मात्र सुदैवाने प्रवाशांचे प्राण वाचले.  ही बस करमाड वरून औरंगाबादच्या मध्यवर्ती बस स्थानकात येत असताना बस ने पेट घेतला आणि पाहता पाहता संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी गेली. या बस मध्ये लहान मुला समवेत 12 प्रवाशी होते. सुदैवाने या अग्निकांडात कोणतीही जीवित हानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. आगीची माहिती मिळतातच अग्निशमनदल घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. तो पर्यंत बस जळून खाक झाली होती. या घटनेचा व्हिडीओ रस्त्यावरील लोकांनी आपल्या मोबाईल मध्ये  कैद केली आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अजिनोमोटो : जिभेचे चोचले पुरवणाऱ्या चायनिज जेवणातला हा पदार्थ किती धोकादायक?