rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित बंद दरवाजे बसवले जातील, रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

lokal munbai
, सोमवार, 9 जून 2025 (15:12 IST)
सोमवारी 9 जून रोजी सकाळी ठाण्यात एक मोठा दुर्दैवी अपघात घडला. लोकल ट्रेनमधून 10 प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. हा अपघात मुंब्रा आणि दिवा दरम्यान सकाळी 9:30 वाजता घडला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर आता मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाने माहिती दिली आहे की आता मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित बंद दरवाजे बसवले जातील.मुंबई उपनगरीय रेल्वे अंतर्गत तयार होणाऱ्या प्रत्येक कोचमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. 
याशिवाय, सध्या वापरात असलेल्या मुंबई उपनगरीय लोकल गाड्यांचे डबे पुन्हा डिझाइन केले जातील आणि त्यामध्ये स्वयंचलित दरवाजे बंद करण्याची सुविधा देखील दिली जाईल. रेल्वेचे सीपीआरओ स्वप्नील नीला यांनी ही माहिती दिली आहे
 
सीएसएमटी ट्रॅक आणि कसारा ट्रॅक वरून दोन लोकल ट्रेन एकमेकांना ओलांडत असताना दोन्ही लोकल ट्रेन जवळ येतातच प्रवासी एकमेकांवर आदळले आणि रुळावर जाऊन पडले या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला.
ठाणे ते सीएसएमटी पर्यंतच्या सहाव्या मार्गाची तपासणी केली जाईल. दोन्ही बाजूंनी लोकल ट्रेन जात असताना फूटओव्हरवर उभे राहून लोक पडण्याची ही पहिलीच घटना आहे. घटनास्थळी सीसीटीव्ही होते की नाही? लोकल ट्रेनमध्ये किती गर्दी होती? याबद्दल माहिती गोळा केली जाईल. याची चौकशी केली जाईल.सीपीआरओ म्हणाले की आम्ही याची चौकशी करत आहोत.
Edited By - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: राज-उद्धव युतीबाबत आदित्य ठाकरे यांचे मोठे विधान