Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अनिल देशमुखांना जामीन मंजूर पण 10 दिवस मुक्काम तुरुंगातच

anil deshmukh
, सोमवार, 12 डिसेंबर 2022 (12:03 IST)
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई हायकोर्टानं अनिल देशमुखांना जामीन दिला आहे.
 
भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयनं नोंदवलेल्या गुन्ह्यात अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र, जामिनावर 10 दिवसांची स्थगिती असल्यानं तोपर्यंत देशमुखांचा मुक्काम तुरुंगातच असेल.
 
एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अनिल देशमुखांना जामीन देण्यात आला आहे.
 
अॅड. अनिकेत निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, "अनिल देशमुखांसाठी वसुली करत होतो, असा जबाब तक्रारदारानं दिला होता. मात्र, त्याचा कुठलाही पुराव नसल्याचे आम्ही कोर्टासमोर सिद्ध केलं. तसंच, बेकायदेशीररित्या अटकेकडेही कोर्टाचे लक्ष वेधून घेतले."
 
अॅड. निकम पुढे म्हणाले, "मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि या प्रकरणातील माफीचे साक्षीदार या जोडगोळीने तपासयंत्रणांना दिलेला जबाब विसंगत होता, हे आम्ही कोर्टाला सांगून, युक्तिवाद केला. त्यानुसार कोर्टानं जामिनाची मागणी मंजूर केली."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

54 मुलांच्या डोक्यावरून उठली बापाची सावली, जाणून घ्या कारण