Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नितेश राणे यांना जामीन मंजूर

नितेश राणे यांना जामीन मंजूर
, बुधवार, 9 फेब्रुवारी 2022 (15:50 IST)
संतोष परब हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणे यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. आमदार नितेश राणे यांना 30 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका झाली आहे. 
 
या प्रकरणी मंगळवारी सुनावणी पार पडली होती, त्यावर आज सिंधुदुर्ग न्यायालयाने निर्णय दिला आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत आज निर्णय दिला आहे.  
 
आमदार नितेश राणेंना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर तब्येतीच्या कारणास्तव त्यांना रुग्णालयात हलवले गेले. आता सिंधुदुर्ग न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हिंगणघाटमध्ये तरुणीला जाळून मारणाऱ्याला काय शिक्षा होणार?