Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुतळे उभारणी मला आवडत नाही - राज ठाकरे

पुतळे उभारणी मला आवडत नाही - राज ठाकरे
नाशिक , बुधवार, 4 जानेवारी 2017 (10:42 IST)
पुतळ्यांवर माझा विश्वास नाही. सरकारने पुतळा उभारणीला घेतला आहे. मात्र तो बांधण्यासाठी पैसाच नाही अशी पुन्हा एकदा टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचे स्मारक असावे आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रांचेच असावे ही गोष्ट मनात पक्की होते. त्यानुसारच नाशिकमध्ये शिवकालीन शस्त्र संग्रहालय उभारण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ही उपस्थिती होते.  निवडणुकीआधी शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाची उभारणी करत मनसेने शिवसेनेलाही अप्रत्यक्षपणे शह देण्याची व्यूहरचना केली आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर मनसेने महापालिकेतर्फे नाशिकमध्ये शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्याचे राज यांनी जाहीर केले होते.
 
नाशिकमध्ये आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज ठाकरे यांनी अनेक विकास कामांचे लोकार्पण सुरु केले आहे. गेल्या आठवड्यात कारंजे आदीचे उद्घाटन केल्या नंतर मंगळवारी शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचे स्मारक अर्थात शिवकालीन शस्त्र संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या संग्रहालयात बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे असलेली शिवाजी महाराजांची शस्त्रे मांडण्यात आली आहे.
 
या  संग्रहालयांच्या उभारणी बाबासाहेब पुरंदरे यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाली आहे. नाशिकचा विकास करत असतांना चांगले विकासक लाभले. यात त्यांनी रतन टाटा, आनंद महेंद्रा, मुकेश अंबाणी एलएअन टी  आदीही लगेच मदत केली. या कामांमध्ये महानगरपालिकेचा एकही पैसा घेतला नाही असेही राज ठाकरे यांनी सांगीतले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा तोडला. हे कृत्य अत्यंत निंदनीय - अजित पवार