Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बंडातात्या कराडकर म्हणतात, राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा

bandatatya-karadkar
, शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (10:06 IST)
राज्य सरकारने सुपर मार्केट तसंच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीस परवानगी देण्यासंबंधी घेतलेल्या निर्णयाला ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी विरोध केला आहे. सातऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात याचे पुरावेदेखील असल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
 
बंडातात्या कराडकर यांनी यावेळी नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेल्याचं सांगत काहीजणांची नावंदेखील घेतली. पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? असंही ते पत्रकारांना म्हणाले. तसंच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख केला. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा असं आव्हानच त्यांनी पत्रकारांना दिलं. तसंच आपण नावं घेतली आहेत त्यांनी पुरावा मागितलं तर सिद्ध करु शकतो असंही म्हणाले. सुप्रिया सुळेंनी बंडातात्या खोटं बोलत आहेत सांगावं असं आव्हानही त्यांनी दिलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

WhatsAppने 6 महिन्यांत 1.32 कोटी भारतीय युजर्सची खाती केली बंद , का जाणून घ्या?