बारामती तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक चक्क दारू पिऊन झोपाळ्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सदर घटना बारामतीच्या तरडोलीयेथील भोईटे वस्तीतील शाळेतली आहे. या घटनेचा व्हडिओ ग्रामस्थांनी बनवला. भरत चव्हाण असे या शिक्षकाचे नाव आहे. ग्रामस्थांनी आणि पालकांनी त्यांना गेल्यावर्षी सुधारण्याची संधी दिली होती. मात्र शिक्षकाने त्याच्यावर लक्ष दिले नाही. आणि विद्यार्थ्यांसमोर मद्यधुंद अवस्थेत वर्गात आले. वर्गात येऊन शिक्षक खुर्चीत टेबलावर डोकं ठेऊन झोपले.
भरपूर दारू प्यायल्याने ते शुद्धीत नव्हते हे पालकांचं लक्षात आल्यावर त्यांनी व्हिडीओ बनवला आणि शिक्षकांची तक्रार वरिष्ठांकडे केली या संपूर्ण प्रकारची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून सदर प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहे. शिक्षक भरत चव्हाण यांची वैद्यकीय तपासणी करून तपासणीचा अहवाल आल्यावर कारवाई करण्याचे शिक्षणाधिकाऱ्यानी सांगितले.
शिक्षकाचा हा अशाप्रकार पाहून पालकांनी देखील संताप व्यक्त केला आहे. ग्रामीण भागात प्राथमिक शाळा हा गावातील एकमेक पर्याय असतो. कारण गावात शिक्षणाचं योग्य सोयी नसतात. शिक्षणासाठी पालक आपल्या मुलांना प्राथमिक शाळेत घालतात. प्राथमिक शाळेत शिक्षकाचे असे वर्तन पाहून पालक संतापले आहे.