मार्च महिन्यात सलग दुसऱ्यांदा उष्णतेच्या लाटेचे सावट आले आहे. पुढील चार दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे या काळात दुपारच्या उन्हात बाहेर जाणं टाळा, असा सल्ला देण्यात आला आहे. यापूर्वी १७ ते १९ मार्चला कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट आली होती. दरम्यान मार्चच्या अखेरीस विदर्भात पारा ४२ अंशावर जाण्याचा अंदाज आहे.
दरम्यान मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोलीत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून विदर्भात अकोला, बुलढाणा आणि नागपुरात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.