Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चौकशीसाठी उपस्थित राहा,अन्यथा घरी येऊन चौकशी करु

चौकशीसाठी उपस्थित राहा,अन्यथा घरी येऊन चौकशी करु
, मंगळवार, 29 जून 2021 (15:30 IST)
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना समन्स बजावून मंगळवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, अनिल देशमुख यांनी वय, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचं कारण पुढे करत ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. यासंदर्भात त्यांनी ईडीला पत्र देखील लिहिलं आहे. दरम्यान, या पत्राला ईडीने उत्तर देत २४ तासांत ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
 
अनिल देशमुख यांनी वकिलामार्फत वय, तसंच कोविड-१९ चा धोका, सरकार कडून लावण्यात आलेले निर्बंध या सर्व गोष्टींचा विचार करून मी ईडी कार्यलयात हजर राहू शकत नाही, असं ईडीला सांगितलं. जमल्यास माझा जबाब ऑडिओ, व्हिडिओमार्फत रेकॉर्ड करण्यात यावा, अशी विनंती करणारं पत्र ईडीला पाठवलं होतं. अनिल देशमुख यांच्या पत्रानंतर ईडीने अनिल देशमुख यांना नव्याने निरोप धाडला आहे. चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात २४ तासांत हजर राहा, अन्यथा घरी येऊन चौकशी करु, असं ईडीने म्हटलं आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

One Nation One Ration Card:परप्रांतीय कामगारांवर SCचे निर्देश, 31 जुलै पर्यंत 'एक राष्ट्र, एक रेशन कार्ड' योजना लागू करा