Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवरायांचे वारसदार असल्याचा अभिमान बाळगा राज ठाकरेंनी युवा पिढीशी साधला संवाद

raj thackeray
, सोमवार, 20 फेब्रुवारी 2023 (09:01 IST)
मुंबई : आपण शिवरायांचे वारसदार आहोत हे कधीही विसरू नका, मराठी पताका ही कायमस्वरूपी डोक्यात ठेवा, तुम्ही मराठी आहात, तुम्ही कोणाचे वारसदार आहात हे लक्षात ठेवा, असा मोलाचा सल्ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युवकांना दिला.
 
शिवजयंती निमित्त व्हिजेटीआय कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी कॉलेजमधील विद्यार्थांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. आपल्या भाषणात राज ठाकरे म्हणाले, वारस हा फक्त आई आणि वडिलांचा नसतो तो आपल्या भूमीकडून देखील असतो, ही गोष्ट जपा आणि वाढवा, आणि या सगळ्या काळाला कधी विसरू नका, कधीही जाति पातीच्या भानगडीत पडू नका.
 
मित्र-मैत्रीण करताना कधीही कोणाची जात पाहू नका, या जाति पाती मधून काहीही हाताला लागणार नाही, आपण मराठी आणि हिंदू आहोत येवढ फक्त लक्षात ठेवा. असा मोलाचा सल्ला राज ठाकरे यांनी कॉलेजवयीन मुला-मुलींना दिला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता धनुष्यबाण मिळाला, उद्या शिवसेना भवन मिळेल : रवी राणा