Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Beed : जत्रेत मुलींची हाणामारी

Beed : जत्रेत मुलींची हाणामारी
, मंगळवार, 13 सप्टेंबर 2022 (08:41 IST)
बीड जिल्ह्यातील माजलगावात गणेशोत्सवाच्यानिमित्ताने भरवलेल्या जत्रेत दोन गटांच्या मुलींमध्ये बाचाबाची नंतर हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
 
माजलगावात शहरात आनंदनगरीमध्ये दरवर्षी गणेशोत्सवात आनंदमेळा भरतो.यंदाच्या वर्षी कोरोनाच्या कालावधीनंतर दोन वर्षानंतर सर्व सण साजरे केले जात आहे. यंदाच्या वर्षी दोन वर्षानंतर सर्व निर्बंध काढल्यानंतर या वर्षी गणेशोत्सव दणक्यात आणि उत्साहात साजरा करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र मेळावे भारतात. लोक  या मेळ्याचा आनंद घेण्यासाठी येतात .या ठिकाणी अनेक तरुण आणि तरुणीचे गट दिसतात. या जत्रेत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आनंद घेतात.
 
या जत्रेत येणाऱ्या तरुणींच्या दोन ग्रुप मध्ये काही कारणांवरून वाद झाला. या वादाचं रूपांतरण हाणामारीत झालं काही लोकांनी या तरुणीचं भांडण सोडण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कोणालाही जुमानले नाही. काही लोकांनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहे. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वादाचे कारण करू शकले नाही. व्हिडीओ पाहून लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे.काही लोकांनी आपण कुठे आहोत ह्याचा भान राखा, अशी प्रतिक्रिया दिली आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लम्पी आजाराबाबत मदतीसाठी राज्यस्तरीय कॉल सेंटर