सध्या दारू पिणाऱ्यांच्या संख्येत विलक्षण वाढ झालेली असून दारूची तस्करी देखील वाढली आहे. दारू तस्करी करण्यासाठी वेगवेगळे स्टाईल वापरतात.जेणे करून पोलिसांच्या तावडीपासून वाचता येईल. या साठी बेळगावात दारू तस्करीसाठी अशी अद्दल तस्करांनी वापरली आहे. त्याला पाहून धक्काच बसला आहे. बेळगावात दारूच्या तस्करीची धक्कादायक घटना उघडकीस आली असून दारू तस्करीचे मोठे रॅकेट पोलिसांनी पकडले आहे.
दारू तस्करीसाठी इलेक्ट्रिक डीपीचा वापर केला असून डीपीच्या आतील बाजूस कप्पे करून दारूची तस्करी केली जात होती. ही दारू गोवा ते तेलंगणा तस्करी केली जात होती. लाईटचे साहित्य नेण्यात येत असल्याचे भासवत दारूची तस्करी केली जात होती.
बेळगावच्या उत्पादन शुल्क विभागाला या तस्करीची खबर मिळाल्यावर त्यांनी टेम्पोचा पाठलाग करून अत्यंत हुशारीने या रॅकेटला पकडले. टेम्पो ताब्यात घेऊन दारू जप्त केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.