Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बेळगाव महापालिका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या हातून गेली

webdunia
सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (12:45 IST)
बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीची पीछेहाट पाहायला मिळतेय.समितीला अवघ्या चार जागांवर यश मिळताना दिसत आहे,तर भाजप पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलेली असून देखील जवळपास 30 जागांवर भाजपला बहुमत मिळण्याच्या मार्गावर आहे.
 
बेळगाव महापालिका निवडणूक आजवर भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावर लढवली गेली होती.मात्र यंदा पहिल्यांदाच राजकीय पक्ष या निवडणुकीत आपापल्या चिन्हांवर रिंगणात उतरले होते.
 
भाजपनं सर्व 58 जागांवर उमेदवार उभे केले होते;तर महाराष्ट्र एकीकरण समितीने 23,काँग्रेसने 39 आणि आपने 24 जागांवर उमेदवार दिले होते.शिवाय एमआयएम, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी देखील आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते.
 
मात्र महाराष्ट्र एकीकरण समिती आणि भाजप यांच्यातच चुरशीची लढत झाल्याचं पाहायला मिळत आहे.महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक उमेदवार अवघ्या काही मतांच्या फरकाने पराभूत झाल्याचं चित्र आहे.
 
राजकीय पक्ष निवडणूक रिंगणात उतरल्याने साम-दाम-दंड-भेद अशा गोष्टींचा पुरेपूर वापर झाल्याची चर्चा बेळगावमध्ये आहे. काही वर्षांचा अपवाद सोडला तर बेळगाव महापालिकेवर कायम महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता होती. यंदा मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीला भाजपनं जोरदार दणका दिल्याचं चित्र आहे.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

आता WhatsApp या Smartphones ला सपोर्ट करणार नाही