Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भंडारा जिल्हा रुग्णालय आगः शल्य चिकित्सकांसह तिघे निलंबित, कंत्राटी आरोग्यसेवकांची मात्र सेवा समाप्ती

भंडारा जिल्हा रुग्णालय आगः शल्य चिकित्सकांसह तिघे निलंबित, कंत्राटी आरोग्यसेवकांची मात्र सेवा समाप्ती
, शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (07:30 IST)
भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयूला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेचा चौकशी अहवाल समितीने सादर केला. त्यांच्या शिफारशीनुसार या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सरकारी सेवेत कायमस्वरूपी असलेले जिल्हा शल्य चिकित्सक यांना निलंबित करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांची बदली, एसएनसीयूच्या विभाग प्रमुख तसेच परिसेविका यांच्यावर निलंबनाची आणि कंत्राटी सेवेत असलेल्या दोन अधिपरिसेविका व एक बालरोगतज्ज्ञ यांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.
 
चौकशी समितीच्या अभिप्रायानुसार एसएनसीयूमधील इलेक्ट्रीक सक्रीटमध्ये आग लागल्याचे सकृत दर्शनी दिसून येत आहे. या दुर्दैवी घटनेत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. नागपूर विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या घटनेची चौकशी केली. त्यामध्ये या कक्षाची जबाबदारी असलेल्या वैद्यकीय अधिकारी, नर्स आणि त्यांच्यावर पर्यवेक्षणाची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबन आणि सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
 
भंडारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते यांना निलंबित, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिला बडे यांची अकार्यकारी पदावर बदली, वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना मेश्राम यांच्यावर निलंबनाची, परिसेविका ज्योती भारसकर यांच्यावर निलंबनाची तर कंत्राटी अधिपरिसेविका स्मिता आंबिलडुके आणि शुभांगी साठवणे यांच्यावर सेवा समाप्तीची कंत्राटी बालरोग तज्ज्ञ डॉ. सुशील अंबादे यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिरममध्ये लागलेल्या आगीचा तपास गुन्हे शाखेकडे