Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा राज्यभर तीव्र आंदोलन

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा राज्यभर तीव्र आंदोलन
, शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (21:24 IST)
सामाजिक न्याय या सारखे खाते सांभाळणाऱ्या व्यक्तीवर एका महिले कडून झालेले आरोप पाहता मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगायला हवे होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेण्या ऐवजी साधी प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केली नाही. त्यामुळे सोमवारपासून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहे, असे भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे यांनी जाहीर केले.
 
सामाजिक न्याय या सारखे मंत्रीपद भूषविणाऱ्या व्यक्तीने आपल्या दुसऱ्या महिलेशी असलेल्या संबंधांची कबुली दिली आहे. पहिल्या पत्नीच्या संमतीनेच आपण सदर महिलेशी संबंध ठेवले, तिच्यापासून झालेल्या मुलांना आपले नाव दिले, याची कबुलीही मुंडे यांनी दिली आहे. मंत्रीपदावरील व्यक्ती अशा पद्धतीचे वर्तन करत असेल तर त्यातून समाजाला काय संदेश जातो आहे,  याचा विचार करावाच लागणार आहे. मुंडे यांच्या विरोधात पोलिसांकडे बलात्काराची तक्रार  दाखल करण्याची धडपड ती महिला करत आहे. मुंडे यांच्या विरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांचे स्वरूप पाहता  व या आरोपांची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांचा राजीनामा घेणे आवश्यक होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळे महिला मोर्चाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे. मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्यात येतील असेही खापरे यांनी या पत्रकात नमूद केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले