Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उदयनराजेंचं नाव न घेता भुजबळ यांचा टोला

उदयनराजेंचं नाव न घेता भुजबळ यांचा टोला
, शनिवार, 12 डिसेंबर 2020 (08:47 IST)
मराठा आरक्षण शरद पवारांमुळे मिळालं नाही असं म्हणणाऱ्या खासदारांचा अभ्यास काय? असा प्रश्न विचारत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उदयनराजेंचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. मराठा आरक्षणावरुन भाजपाचं पडद्यामागचं राजकारण सुरु आहे असाही आरोप भुजबळ यांनी केला आहे. यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की, मराठा आरक्षण देण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा नसतो. घटनेनुसार ते मिळत असतं. मात्र शरद पवारांवर आरोप करणाऱ्या खासदारांचा त्यावर अभ्यास नाही त्यामुळे ते शरद पवारांवर टीका करत आहेत असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 
 
एमपीएससीपासून सर्व भरती थांबली आहे. राज्यातील वातावरण बिघडू नये म्हणून सरकार सबुरी ने घेत आहे. आरक्षण देण्याची घोषणा 2013/14 मध्ये आघाडी सरकारने केली होती. शरद पवार यांच्या विषयी गैरसमज पसरविले जात आहे. ओबीसीला आरक्षण खूप पूर्वी मिळाले आहे. आयोगाने आरक्षण दिले, मुख्यमंत्री केवळ अंमलबजावणी करत असतात, आमच्यावर मराठा विरोधी म्हणून आरोप होत आहेत, नोकर भरती करायला जातो तेव्हा मराठा समाज विरोध करतो. बॅक स्टेज राजकरण सुरू आहे, पवारांनी आरक्षण होऊ दिले नाही असे भाजपचे खासदार म्हणताय त्यांचा काय अभ्यास आहे. भाजपचे दोन्ही खासदार नेतृत्व करत आहेत. कोण राजकारण करत आहे समजून घ्यावे. कोर्टात चांगले वकील उभे केलेत मराठाला आरक्षण मिळावे ही अपेक्षा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आयआरसीटीसीची आजपासून विक्री ऑफरमधील 20 टक्क्यांपर्यंत हिस्सा विकण्याची योजना आहे