rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भुजबळ शिवसेनेत परतणार, उद्धव यांचे सूचक वक्तव्य

Bhujbal will return to Shiv Sena
, बुधवार, 21 ऑगस्ट 2019 (16:39 IST)
राज्यातील निवडणुकांचे वातावरण तापले असून, अनेक मोठे नेते धक्का देत इतर पक्षात प्रवेश करत आहेत. देशात भाजपा तर राज्यात शिवसेनेत अनेक प्रवेश करत आहेत. त्यात आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे नाव सुध्दा चर्चेत असून ते पुन्हा त्यांच्या पक्ष शिवसेनेत जाणार अशी जोरदर चर्चा आहे. मात्र भुजबळांनी या चर्चा चुकीच्या असल्याचं म्हणत शिवसेना प्रवेशाचं वृत्त फेटाळलं.
 
दरम्यान, भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाबाबत खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारले त्यावर उद्धव ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. “वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचे उत्तर मिळेल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले  आहेत.
 
उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाच्या शक्यता निर्माण झाली आहे. भुजबळ पुन्हा शिवसेनेत परतणार का हा एकच प्रश्न शिवसैनिकांमध्ये चर्चिला जात आहे. जर भुजबळ यांची राष्ट्रवादी सोडली तर राज्यातील राजकारणात मोठे बदल होतील व राष्ट्रवादीला मोठा धक्का असणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे शिवसेनेत, वाचा काय आहे सत्य