Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का; मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा राजीनामा

dilip datir
, बुधवार, 19 एप्रिल 2023 (22:01 IST)
R S
नाशिक प्रतिनिधी  -  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिक महापालिकेमध्ये 2012 मध्ये  सत्ता मिळवली . मात्र त्यानंतर आता पर्यंत  पक्षाची अवस्था बिकट झाली  आहे. अनेक नेते सोडून गेले तर अजूनही  गटबाजी मात्र थांबलेली नाही. त्यातच आता  मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून आपल्याला पद मुक्त करावे अशी विनंती करणारे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवले आहे.
 
दिलीप दातीर हे शिवसेनेचे नगरसेवक असताना त्यांनी राजीनामा देऊन मनसेत प्रवेश केला होता. २०१९ मध्ये मनसेच्या माध्यमातून पश्चिम नाशिक विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान त्यानंतर त्यांना राज ठाकरे यांनी शहराध्यक्षपदी नियुक्त केले होते. नाशिकमध्ये मनसेत मोठ्या प्रमाणात गटबाजी असून त्याची वेळोवेळी चर्चा होत असते, त्यातच दातीर यांनी राजीनामा दिल्यामुळे उलट सुलट चर्चा होत आहे.
 
दिलीप दातीर यांच्याशी संपर्क साधला असता आपला व्यक्तिगत कारणामुळे हा राजीनामा दिला असून आपण पक्ष सोडलेला नाही. पुढील आठवड्यात आपण राज ठाकरे यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार असल्याचे ते म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री सदस्यांचे मृत्यू उष्माघाताने की चेंगराचेंगरीने? हा 'सदोष मनुष्यवधाचा प्रकार' विरोधकांचा आरोप..