Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नागपूरमध्ये बर्ड फ्लूचा कहर! १,००० कोंबड्यांची कत्तल, १४,००० अंडी पुरली

Bird Flu
नागपूरच्या सेमिनरी हिल्स येथील सरकारी अंडी उबवणी केंद्रात बर्ड फ्लूची लागण झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी, केंद्रातील १,००० हून अधिक कोंबड्या मारण्यात आल्या आहे आणि अंदाजे १४,००० अंडी पुरून नष्ट करण्यात आली आहे. अशी माहिती समोर आली आहे. 
 
गेल्या काही दिवसांत केंद्रातील मोठ्या संख्येने कोंबड्या अचानक मरण पावल्या आहे. त्यानंतर नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग संस्थेत पाठवण्यात आले. प्रयोगशाळेत बर्ड फ्लूची पुष्टी झाल्यानंतर, प्रशासनाने तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या. १० किलोमीटरचा परिसर निगराणीखाली ठेवण्यात आला असून, कोंबड्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
 
महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांना ओळखण्यासाठी हॅचरीच्या १ किलोमीटरच्या परिसरातील घरांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. याव्यतिरिक्त, १० किलोमीटरचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात कोंबड्या आणि अंड्यांची विक्री, कोंबड्यांची खरेदी-विक्री आणि कुक्कुटखाद्याच्या व्यापारावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, पक्ष्यांशी संबंधित कोणतेही कार्यक्रम किंवा कृषी प्रदर्शने आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 
हॅचरीचे तीस कर्मचारी या संक्रमित पक्ष्यांच्या थेट संपर्कात आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून, आरोग्य विभागाने या सर्व कर्मचाऱ्यांना १० दिवसांची औषधे वितरित केली आहे. महापालिकेची पथके घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहे, जेणेकरून संसर्गाची कोणतीही मानवी लक्षणे वेळेवर ओळखता येतील.  
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वीज बिलावरील नाव बदलण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेची २५ लाख रुपयांची फसवणूक