गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये सुरू असलेली प्राणी आणि पक्षी विक्रीचा बेकायदेशीर धंदा करणारी दुकानं तात्काळ बंद करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. तसेच ही दुकानं पुन्हा सुरू होणार नाहीत याची पालिका प्रशासन आणि स्थानिक पोलिस स्टेशननं काळजी घ्यावी. जर ही कारवाई जमणार नसेल तर हायकोर्ट तुमच्यावर कारवाई करेल असा सज्जड दम हायकोर्टाने दिला आहे. पशु पक्षांसाठी कार्यरत एका सेवाभावी संस्थेनं यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना पशू पक्षांवर होणाऱ्या अत्याचार कायद्याअंतर्गत हायकोर्टानं हे आदेश दिले आहेत.