महाराष्ट्रात नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.तसेच राज्यातील विभागाचे वाटप देखील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी झाले. या नंतर काही नेते मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज होते. मात्र आता केबिनेटचे काही मंत्री नाराज सल्याचा बातम्या समोर येत आहे.
राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने खात्यांचे वाटप करून नवीन मंत्र्यांना सरकारी घरे दिली. आता शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये घरांबाबत नाराजी सुरू झाली आहे. सरकारी घरांबाबत मंत्र्यांमध्ये मतभेद सुरू झाले आहेत.
या वेळी शिवसेनेच्या काही मंत्र्यांना सरकारी बंगल्याऐवजी फ्लॅट वाटप करण्यात आले या कारणास्तव त्यांच्यामध्ये नाराजी आहे.
यावेळी भाजपच्या अनेक बड्या मंत्र्यांना मोठे आणि पॉश सरकारी बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे. तर एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेच्या काही कॅबिनेट मंत्र्यांना फ्लॅटचे वाटप करण्यात आले आहे.हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयाचे विभाजन केले. गृहखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असताना या वेळी अर्थखाते पुन्हा अजित पवार यांच्याकडे गेले. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते देण्यात आले आहे.