Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजपकडून 'एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर'

भाजपकडून 'एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर'
, बुधवार, 22 जून 2022 (22:47 IST)
भाजपने एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपकडून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. शिवसेना आमदार आणि भाजपमध्ये या संदर्भात वाटाघाटी सुरु आहे या वर एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेला मुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक वरील संवादानंतर ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट मंडळी आहे. आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडणं का गरजेचं आहे, हे स्पष्ट केले आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दिलेला प्रस्ताव फेटाळून पुन्हा परत न येण्याची भूमिका मंडळी आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून 4 मागण्या मांडल्या आहेत.
1.गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला.
 
2.घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे.
 
3.पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
 
4.महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.
 
तर शिवसेनेकडे केलेल्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आम्ही भाजपबरोबर सरकार बनवायला तयार आहोत, असं सूत्रांनी सांगितलं आहे. भाजपची मंडळ एकनाथ शिंदेंच्या सतत संपर्कात आहे असल्याचं सूत्रांनी मान्य केलं आहे.
 
गुवाहाटीतून एकनाथ शिंदे यांचा बुधवारी सकाळी उद्धव ठाकरेंशी संपर्क झाला आहे. तूर्तास तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. पण आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाणार नाही, असं शिंदेंच्या गटातून सांगण्यात आलं आहे.
 
उद्धव ठाकरेंना भेटायला जाण्याचा निर्णय सगळ्या आमदारांचा असेल. सगळे एकत्र येऊन निर्णय घेतील उद्धव ठाकरे यांना भेटायचं की नाही, 
 
एकनाथ शिंदे यांनी वेळेवेळी उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या व्यथा मांडल्या होत्या पण त्यावर काहीच तोडगा काढण्यात आला नाही, म्हणू एकनाथ शिंदेंनी हे पाऊल उचलल्याचं त्यांच्या निकटवर्तींयांचं म्हणणं आहे.
 
ग्रामीण भागात शिवसेना खूपच कमकुवत आहे, शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नाहीये. सरकराच्या कामांच श्रेय मिळत नाहीये, यामुळे आमदारांमध्ये खदखद आहे. जी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली होती, पण त्यातून पुढे काहीच निष्पन्न झालं नाही, 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

षडयंत्र भाजपचं; नितीन देशमुख यांचा गौप्यस्फोट