Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 16 March 2025
webdunia

भाजपचे राजवट औरंगजेबाच्या काळापेक्षा वाईट, संजय राऊतांचे वादग्रस्त विधान

sanjay raut
, शनिवार, 15 मार्च 2025 (18:25 IST)
महाराष्ट्रात औरंगजेबाच्या नावाखाली राजकारण सुरूच आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केलेल्या औरंगजेबाच्या विधानावरून गोंधळ सुरु झाला. आता या मध्ये शिवसेना यूबीटीचे नेते संजय राऊतांनी वादग्रस्त विधान केले आहे.
ALSO READ: 'एकनाथ शिंदेंना आधी काँग्रेसमध्ये सामील व्हायचे होते', संजय राऊतांचा मोठा दावा
ते म्हणाले, महाराष्ट्रात भाजपचे राजवट औरंगजेबाच्या काळापेक्षा देखील वाईट आहे. राज्यातील शेतकरी, बेरोजगार आणि महिला आत्महत्या करत आहे आणि यासाठी भाजप जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला.
संजय राऊत यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'औरंगजेबाच्या निधनाला 400 वर्षे झाली आहेत. त्याला विसरून जा. औरंगजेबामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करत आहेत का? नाही, ते तुमच्यामुळेच हे करत आहेत. ते पुढे म्हणाले, 'जर मुघल शासकाने अत्याचार केले असतील तर सरकार आता काय करत आहे?' शेतकरी आत्महत्या करत आहेत. भाजपचे राज्य औरंगजेबाच्या काळापेक्षाही वाईट आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिंदेंना संजय राऊत ताकतवर बनवतात, शायना एनसी यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल