अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत देण्याच्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या निर्णयाचे आपण स्वागत करत आहोत. पण शेतकऱ्यांना अधिक मदतीची गरज असून मा. राज्यपालांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून अधिक मदतीचा निर्णय जाहीर करावा. भाजपा महायुती सरकारने राज्यातील शेतीसाठी २३ हजार कोटी रुपयांच्या विम्याचा प्रिमियम भरला असून त्यानुसार शेतकऱ्यांना पिकविम्याची मदत करण्यासाठी मा. राज्यपालांनी पीक विमा कंपन्यांना पाचारण करावे, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, मा. राज्यपालांनी शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. पण शेतकऱ्यांना अधिक मदतीची गरज आहे. त्यानुसार मा. राज्यपालांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा व केंद्र सरकारच्या मदतीने शेतकऱ्यांना अधिकची मदत जाहीर करावी. भाजपा महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या २३ हजार कोटी रुपयांच्या पीकविम्यासाठी प्रिमियम भरला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना पीकविम्याची अधिक मदत मिळणे अपेक्षित आहे. मा. राज्यपालांनी संबंधित पीकविमा कंपन्यांना पाचारण करावे आणि विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीकविमा द्यावा यासाठी मार्गदर्शन करावे.