Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोल्हापुरात मृत्यूनंतर मृतदेहाची विटंबना,1 तास मुसळधार पावसात भिजत पडून होता

Kolhapur CPR Hospital
, शुक्रवार, 4 जुलै 2025 (15:57 IST)
कोल्हापुरात अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी नेत असताना भर मुसळधार पावसात भिजत ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात घडली आहे. 
या सरकारी रुग्णालयात मृत्यूनंतर मृतदेहाची विटंबना केली जात असल्याचे समजल्यावर रुग्णालया प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि गैर कारभाराविरुद्ध नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 
ALSO READ: गडचिरोलीत उपचाराच्या नावाखाली ढोंगी डॉक्टरकडून २६ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार
अपघातात मृत्युमुखी झालेल्या व्यक्तीचे नाव गजानन वाळवेकर(50 रा. गडमुडशिंगी), असल्याची चिट्ठी मृतकाच्या कपड्यांमध्ये सापडली आहे.लक्ष्मीपुरी पोलिसांनी पुढील तपासासाठी गांधीनगर पोलिसांना कळवले असून संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी 12:30 च्या सुमारास गडमुडशिंगी रोड वरील एका हॉटेल समोर झालेल्या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असून गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उपचाराधीन असता त्याचा मृत्यू झाला. 
 
मृत्यूनंतर, एका वॉर्ड बॉय आणि एका महिला कंत्राटी कामगाराने मृतदेह स्ट्रेचरवर बसवून अपघात विभागाशेजारी असलेल्या पोलिस ठाण्यात नेला, जेणेकरून मृतदेहाची ओळख पटेल आणि माहितीसाठी पोलिसांना रेकॉर्ड देता येईल.
ALSO READ: मुंबई : बिस्किटात निघाला किडा, न्यायालयाने अंतिम निकाल देत कंपनीला १.५ लाख रुपयांचा दंड ठोठावला
पण या वेळी मुसळधार पाऊस सुरु झाला आणि पोलीस ठाण्यात कोणीही नसल्याने त्यांना काय करावे हे समजले नाही आणि ते मृतदेह तसेच स्ट्रेचरवर सोडून निघून गेले. सुमारे तासभर पावसात मृतदेह पडून राहिले. मृतदेह सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. 
 
इतर कर्मचाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधल्यावर मृतदेहाची चौकशी प्रक्रिया पूर्ण केल्यावर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले.प्रशासनाच्या असंवेदनशीलतेमुळे मृत्यूनंतर होणाऱ्या निष्काळजीपणामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: अमित शाह यांनी जायरम स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन केले