Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

MTDCचे रिसॉर्ट बुक करा कुठूनही मेक माय ट्रीप,स्काय-हायसह विविध संस्थांसमवेत करार

MTDCचे रिसॉर्ट बुक करा कुठूनही मेक माय ट्रीप,स्काय-हायसह विविध संस्थांसमवेत करार
, बुधवार, 18 ऑगस्ट 2021 (08:57 IST)
महाराष्ट्राला नैसर्गिक, ऐतिहासिक,पौराणिक, भौगोलिक असे विविधांगी पर्यटनवैभव लाभले आहे. राज्यात जंगले, पुरातन गडकिल्ले,गुंफा, मंदिरे,समुद्रकिनारे,वन्यजीव असे पर्यटन वैविध्य असून हे जगाभरापर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यातून देशातील आणि जगभरातील पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होतील आणि त्याद्वारे राज्याचा पर्यटनविकास होऊन रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल,असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
 
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) विविध उपक्रमांचा मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते आज वर्षा निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. 
 
एमटीडीसीचे नवीन संकेतस्थळ, सिंहगड येथील नूतनीकरण झालेले पर्यटक निवास आणि गणपतीपुळे येथे बोट क्लबचा शुभारंभएमटीडीसीने जलद आणि अधिक कार्यक्षम सेवा देण्यासाठी सुधारीत बुकींग इंजिन तसेच राज्यातील पर्यटनस्थळांच्या तपशीलवार माहितीसह नवीन संकेतस्थळ सुरु केले आहे.तसेच सिंहगड (जि. पुणे) येथील एमटीडीसीच्या पर्यटक निवासाचे नुतनीकरण करण्यात आले आहे.गणपतीपुळे (जि. रत्नागिरी) येथे बोट क्लब सुरु करण्यात येत असून या तिन्ही उपक्रमांचा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते यावेळी शुभारंभ करण्यात आला.
 
मेक माय ट्रीप, स्काय-हायसह विविध संस्थांसमवेत सामंजस्य करारत्याचबरोबर एमटीडीसीच्या पर्यटक निवासांचे बुकींग अधिक सुलभ होणे आणि जगभरातील पर्यटकांसाठी ही बुकींग सुविधा उपलब्ध होण्यासाठी मेक माय ट्रीप आणि गोआयबीबो या नामांकित संकेतस्थळांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे एमटीडीसीची पर्यटक संकुले आता ही संकेतस्थळे वापरुन कोठुनही बूक करता येणार आहेत.महाराष्ट्रात स्काय डायव्हींग साहसी क्रीडा प्रकार सुरु करण्याच्या दृष्टीने स्काय-हाय सोबत सामंजस्य करार करण्यात आला.तसेच एमटीडीसी कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्या सोबतही सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील आणि संबंधित संस्थेच्या प्रतिनिधींनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खासदार उदयनराजे भोसले यांना करोनाचा संसर्ग