Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बोरी अंबेदरी, दहिकुटे पाईप कालवाव्दारे 60 टक्के पाणी बचत होणार

बोरी अंबेदरी, दहिकुटे पाईप कालवाव्दारे 60 टक्के पाणी बचत होणार
, शनिवार, 1 जानेवारी 2022 (08:33 IST)
बोरी अंबेदरी, दहिकुटे पाईप कालवा कामांचे नियोजन आढावा बैठक आज राज्याचे कृषीमंत्री व माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. या बैठकीला  पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अभिजित रौदंळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी  दिलीप देवरे, कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, आदिसह लाभ क्षेत्र भागातील शेतकरी उपस्थित होते.
 
दहीकुटे लघु पाटबंधारे प्रकल्पाचा मुख्य कालावा  6.54 कि.मी. मध्ये बंदीस्त नलीकेव्दारा पाणी पुरवठा करण्याचे विशेष दुरुस्तीचा कामास 7.36 कोटी एवढया रकमेस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असल्याची माहिती मंत्री भुसे यांनी बैठकीत दिली.
 
सदर कामाचे अंदाजपत्रक रकक्म 7 कोटी 35 लाख 39 हजार 603  इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकस मुख्य अभियंता जलसंपदा विभाग यांनी तांत्रिक मान्यता दिली असून निविदा प्रक्रिया प्रगतीपथवर असल्याचे मंत्री भुसे यांनी बैठकीत नमूद केले. या गृहीतकाने प्रकल्पाचा प्रति हेक्टरी विसर्ग हा रब्बी हंगामाकरीता 148 क्युसेसक्स प्रति हेक्टरी इतका आहे. खरीप हंगामाकरीता 85 क्युसेक्स प्रति हेक्टरी इतका परिगणित होतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तीन चाकी रिक्षा या निवडणुकीत पंक्चर : चंद्रकांत पाटील