Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रियकराने प्रियेसीचा कापला गळा, इचलकरंजीतील घटना

crime
, गुरूवार, 24 ऑगस्ट 2023 (07:20 IST)
परपुरुषासोबत बोलल्याच्या रागातून प्रियकराने प्रियेसीचा चाकूने गळा कापून गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील जवाहरनगर परिसरात घडली आहे. छाया संतोष शिवशरण (वय 37 रा. जवाहरनगर, इचलकरंजी ) असे जखमी महिलेचे नांव आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसानी किशोर लक्ष्मण सोळंकी (रा. जवाहरनगर, इचलकरंजी) या संशयीत आरोपीला त्वरीत अटक केली असून, तो राज्य परिवहन विभागाच्या कागल एसटी आगरात नोकरी करीत आहे. त्याच्या विरोधी खुनाचा प्रयत्न केल्याबाबत पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे.
 
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी,जखमी छाया शिवशरण आणि संशयीत आरोपी किशोर सोळंकी हे दोघेही विवाहित आहे. या दोघांच्यात गेल्या काही महिन्यापासून प्रेमसंबंध निर्माण झाले.त्यातून हे दोघे राहत्या घरातून दोन महिन्यापूर्वी निघून येवून,शहरातील जवाहरनगर परिसरातील एका भाड्याच्या घरात एकत्र राहत होते.सोमवारी रात्रीच्या सुमारास छाया ही एका परपुरुषासोबत बोलत असल्याचे संशयीत आरोपी किशोर सोळंकी याने पाहिले. त्यावरुन या दोघामध्ये शाब्दीक वाद सुरु झाला. या वादातून चिडून संशयीत आरोपी किशोर सोळंकीने जखमी प्रियेशी छायाला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली.
 
तसेच तिला खाली पाडून तुला जिवंत सोडत नाही असे म्हणत, घराच्या किचनमधील चाकूने तिचा गळा चिरला. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली असून, तिला उपचाराकरीता शहरातील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. या घडल्या प्रकराची माहिती शिवाजीनगर पोलिसाना समजली. त्यांनी त्वरीत घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. जखमीकडून सविस्तर माहिती घेतली. तिने फिर्यादीवरुन संशयीत आरोपी किशोर सोळंकी विरोधी खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्याचा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथका कडून शोथ सुरु केला. या पथकाला तो पहाटे मिळून आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pradeep Sharma granted bail प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर