Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र उकाड्याचा सामना करण्यास सज्ज

Maharashtra
Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्रातील वाढती उष्णता आणि हवामान बदलाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी, मुख्यमंत्र्यांनी आयआयएम नागपूर येथे 'उष्णता प्रतिरोधकता आणि शाश्वत शीतकरण उत्कृष्टता केंद्रा'चे उद्घाटन केले. महाराष्ट्रात राजकारणाशी आणि राज्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा.

मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याबाबत ४ मे पर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. या याचिकेवरील पुढील सुनावणी ५ मे रोजी होणार आहे.

महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारी २१ एप्रिलपासून अनिश्चित काळासाठी संपावर जात आहेत. १७ लाख कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, तर दुसरीकडे सरकारने हा संप बेकायदेशीर घोषित करून कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

लोकसभेत फेटाळण्यात आलेल्या महिला आरक्षण विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारी २१ एप्रिलपासून अनिश्चित काळासाठी संपावर जात आहेत. १७ लाख कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, तर दुसरीकडे सरकारने हा संप बेकायदेशीर घोषित करून कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.सविस्तर वाचा 

लोकसभेत फेटाळण्यात आलेल्या महिला आरक्षण विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. सविस्तर वाचा 

मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याबाबत ४ मे पर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. या याचिकेवरील पुढील सुनावणी ५ मे रोजी होणार आहे. सविस्तर वाचा 

आरोग्य योजना अधिक प्रभावी करण्यासाठी महाराष्ट्र एकात्मिक डिजिटल प्रणाली राबवत आहे. एका आढावा बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णांना जलद आणि पारदर्शक मदत देण्याच्या गरजेवर भर दिला. सविस्तर वाचा 

महाराष्ट्र सरकारने शेतजमिनीच्या विभाजनासाठी लागणारे नोंदणी शुल्क रद्द करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. यामुळे ही प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि किफायतशीर होईल.

महाराष्ट्र सरकारने शेतजमिनीच्या विभाजनासाठी लागणारे नोंदणी शुल्क रद्द करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. यामुळे ही प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि किफायतशीर होईल. सविस्तर वाचा 

राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्याविरोधात सक्षम आव्हान उभे करू शकणारे शरद पवार गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोर धरत होत्या. सविस्तर वाचा

 बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे.या दिवशी आपल्या मतदानाचा हक्क सर्वांना बजावता यावा या साठी  प्रशासनाने सर्व कामगारांची आणि कर्मचाऱ्यांसाठी सवेतन सुट्टी जाहीर केली आहे.

शरद पवार यांना आज पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना मागील महिन्यात प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवस त्यांच्यावर उपचार केल्यावर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिले.सविस्तर वाचा 

महाराष्ट्रात पुढील १२० तास जोरदार पाऊस पडणार आहे. एकीकडे तीव्र उष्णतेचा प्रभाव आहे, तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा धोका आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) विदर्भ, मराठवाडा आणि कोकणसह राज्याच्या अनेक भागांमध्ये २४ एप्रिलपर्यंत तीव्र गारपीट, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासाठी 'हाय अलर्ट' जारी केला आहे. सविस्तर वाचा

शिवसेनेच्या मंत्र्यांना मिळणाऱ्या वाईट वागणुकीचा मुद्दा विधानसभेतही गाजला. त्यानंतर प्रचंड दबावाखाली मुख्यमंत्री फडणवीस यांनी तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. रजेवरून परतल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांची आता सांगली येथे बदली करण्यात आली आहे सविस्तर वाचा

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. या दिवशी आपल्या मतदानाचा हक्क सर्वांना बजावता यावा या साठी  प्रशासनाने सर्व कामगारांची आणि कर्मचाऱ्यांसाठी सवेतन सुट्टी जाहीर केली आहे.सविस्तर वाचा

मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक ३० मधून नगरसेवकपदाची निवडणूक जिंकलेल्या सहर शेख, "कैसे हराया'' या वाक्यामुळे चर्चेत आल्या आहे. त्या एआयएमआयएम (AIMIM) पक्षाच्या सदस्य आहे. त्यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्र तयार केल्याचा आरोप आहे. सविस्तर वाचा 

मुंबई महानगरपालिकेतर्फे १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत शहराच्या हरित पट्ट्याचे रक्षण करण्यासाठी 'वृक्ष संजीवनी' अभियान मोठ्या उत्साहात राबवले जात आहे. सविस्तर वाचा 

लेन्सकार्ट स्टोअर्समधील ड्रेस कोडचा मुद्दा वाढत असल्याचे दिसत आहे. भाजप नेत्या नाझिया खान यांनी मुंबईतील एका लेन्सकार्ट स्टोअरमध्ये व्यवस्थापक मोहसिन खान यांना फटकारले. त्यांनी कर्मचाऱ्यांना टिळा लावला. कामाच्या ठिकाणी हिंदू चालीरीती दडपण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सविस्तर वाचा 

गडचिरोलीच्या अलापल्ली वनक्षेत्रात एका मोठ्या मोहिमेत वन विभागाने १२ शिकाऱ्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून शेखरूसह दुर्मिळ वन्यजीवांचे अवशेष जप्त करण्यात आले आहे. सविस्तर वाचा 

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात मंगळवारी एका बेकायदेशीर फटाका कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला. या भीषण दुर्घटनेत दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. मृतांची ओळख भावेश दिलीप वावरे आणि मोनिका सचिन पाडवाले अशी पटली आहे. स्फोट इतका शक्तिशाली होता की कारखान्याचे छत उडून गेले आणि जवळच्या घरांमध्येही धक्के जाणवले. सविस्तर वाचा 

मीरा-भयंदरमध्ये भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नगरसेवकाने महिलेवर ब्लॅकमेल आणि खंडणी मागितल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे. अशी माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचा

अमरावतीमधील सरकारी कर्मचारी अनिश्चित काळासाठी संपावर गेले 
सरकारी आणि निम-सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनिश्चित काळाच्या संपामुळे राज्यभरातील कामकाज ठप्प झाले असून, सर्वसामान्य जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

सर्वाधिक चर्चेत असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा प्रचार मंगळवारी थांबला. सविस्तर वाचा 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिक्षकाकडून विचित्र शिक्षा, मुलांना एकमेकांच्या पॅन्टमध्ये खाज सुटणारे पान कोंबायला सांगितले; मुख्याध्यापक निलंबित