Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आपल्या घरी बाप्पाची मूर्ती शाडुचीच आणा!

Ganesha Durva
, मंगळवार, 28 जून 2022 (12:22 IST)
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारं प्रदूषण आणि धोका लक्षात घेऊन बाप्पाच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. यंदा गणेश चतुर्थीn31 ऑगस्टला  असल्यामुळे गणेश मूर्ती निर्मितीला आता वेग आला आहे.
 
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारं प्रदूषण आणि धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्या मूर्ती पाण्यात पूर्ण विसर्जित होत नाहीत. त्याचे अवशेष जसेच्या तसे राहतात. त्यामुळे होणारा त्रास लक्षात घेऊन ही बंदी यावर्षीही कायम ठेवण्यात आली आहे.
 
पीओपीच्या मूर्तींमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मूर्तीकारांमध्ये काहीशी नाराजी देखील आहे. तर नियमांचं उल्लंघन होणाऱ्यांवर कोणती कारवाई होणार याबाबत अजून निर्णय होणं बाकी आहे. त्याबाबत लवकरच निर्णय येऊ शकतो.

गणेश चतुर्थी आणि नवरात्रीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वापरण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी कायम ठेवली आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेशही महापालिकांना देण्यात आले आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND-W vs SL-W: श्रीलंकेने भारताला क्लीन स्वीप करण्यापासून रोखले, तिसरा T20 विजय, हरमनप्रीतला मालिकावीर घोषित