रायगडमध्ये भंगार गोडाऊन शेजारी भंगारमध्ये घेतलेल्या बंद होडा सिटी कारमध्ये गुदमरल्याने दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला आहे. कारचे दारं लॉक झाल्याने या सख्ख्या भावांचा गुरमरुन मृत्यू झाला आहे. सुहेल खान (वय-6) आणि अब्बास खान (वय-4) अशी या दोन भावंडांची नावं आहेत.
या घटनेमध्ये हे दोघे चिमुरडे संध्याकाळी खेळताना या गाडीत बसले असावे. दरम्यान, गाडी लॉक झाली आणि ती त्या दोघांना उघडता आली नाही. त्यामुळे गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. घरातील आणि परिसरातील लोकांना सदरची घटना कळताच पोलिसांना कळविण्यात आले.महाड शिरगाव येथील साळुखें रेस्क्यु टीमच्या सहाय्याने कार उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, कार बाहेरुन उघडण्यात अपयश आल्याने अखेर कारच्या काचा फोडुन चिमुरड्यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तात्काळ दोन्ही चिमुरड्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.