Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोल्हापुरात महिलेची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

murder
, रविवार, 22 ऑक्टोबर 2023 (17:23 IST)
कोल्हापुरात जवाहरनगर परिसरात सरनाईक वसाहतीत एका महिलेची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. लक्ष्मी विलास क्षीरसागर असे या महिलेचे नाव आहे. हत्येचं कारण अद्याप कळू शकले नाही. 
 
सदर घटना जवाहर नगर परिसरात घडली आहे. मयत महिला लक्ष्मी या आपल्या राहत्या घरातून रोहिदास कॉलोनी येथून बेपत्ता होत्या. त्यांचा कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असून त्यांचा कुठे पत्ता लागला नाही. त्यांनी राजाराम पोलीस ठाण्यात महिलेची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांना शोधायला  सुरुवात केली. 

आज सकाळी पोलिसांना जवाहरनगर परिसरात एका मोकळ्या जागेत एका  महिलेचा मृतदेह आढळला.पोलिसांनी तपास केला असता त्यांना हे मृतदेह लक्ष्मी यांचे असल्याचे आढळले. मयत लक्ष्मी यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले. त्यांची हत्या मागील कारण अद्याप कळू शकले नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले असून पुढील तपास सुरु आहे. 
 



Edited by - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'जागतिक भूक निर्देशांक' म्हणजे काय? स्मृती इराणींच्या वक्तव्यावरून वाद का होतोय?