मुंबई महापालिकेची निवडणूक होईपर्यंत पालिकेवर आयुक्त इक्बाल चहल यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प ३ फेब्रुवारी रोजी प्रशासक आणि आयुक्त इक्बाल चहल हे त्यांच्या अधिकारात सादर करतील.
गतवर्षी ३ फेब्रुवारी २०२२ रोजी आयुक्त इक्बाल चहल यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि महापौर किशोरी पेडणेकर यांना ४५,९४९.२१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. वर्ष २०२१ च्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत २०२२ चा अर्थसंकल्प हा ६,९१०.३८ कोटी रुपये एवढ्या जास्त रकमेचा होता. यंदाच्या अर्थसंकल्पात कर अथवा दरवाढ करण्याची शक्यता कमीच असणार आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor