सध्या सर्वत्र नवरात्रोत्सव आनंदात आणि दणक्यात साजरा केला जात आहे. ठीक ठिकाणी नवरात्रोत्सवात गरबांचे आयोजन केले जाते. तब्बल दोन वर्षानंतर सर्व सण साजरे केले जात असल्यामुळे यंदा सण जल्लोषात साजरे केले जात आहे. गरबा महोत्सवाचे ठीक ठिकाणी आयोजन केले जात असताना तरुण , लहान मुलं, मुली , महिला भाग घेत आहे. गरबात सर्व बेधुंद होऊन हिंदी- गुजराती गाण्यांच्या ठेक्यावर नाचतात आणि गरब्याचा आनंद घेतात.
गेल्या तीन -चार दिवसांपासून गरब्यात नाचताना मृत्यू झाल्याच्या बातम्या येत आहे. काल गुजरातच्या तरुणाचा मृत्यूची बातमी मिळाल्यावर आज बुलढाण्यातून देखील गरबा खेळताना एका 42 वर्षाच्या इसमाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. बुलढाण्यात मेहकर तालुक्यात जानेफळ गावात ही घटना घडली असून विशाल पडधरीया(42) या इसमाचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाण्यातील मेहकर तालुक्यात जानेफळ गावात वीर सावरकर नव्रारता उत्सव मंडळाच्या वतीने गरब्याचे आयोजन करण्यात आले असून गावातील विशाल पडधरीया हे देखील गरबा खेळायला आले असता विशाल याना अचानक हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि ते खाली कोसळले. त्यांना तातडीनं रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूने गावात गोकाकला पसरली आहे.